कोविड उपचार केंद्रात दाखल महिलांच्या विनयभंगाचे प्रकार निषेधार्ह – रामदास आठवले

ramdas athawale

मुंबई : ‘कोविड उपचार केंद्रात दाखल महिलांचा विनयभंग होण्याच्या राज्यात घडलेल्या घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणाऱ्या व निषेधार्ह आहेत. याबाबत महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष झाल्यानेच राज्यात असे निंदनीय प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखले पाहिजेत, महिलांच्या सुरक्षेकडे राज्य सरकार लक्ष घालून कायदा आणि सुव्यवस्था मजबूत राखावी,’ असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मुंबईत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे विविध विषयांवर आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेस रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ‘मुंबईतील मनपा च्या 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून मालकी हक्काचे घर द्यावे त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा च्या मुंबई मनपाला मिळणारी घरे मनपा च्या सफाई कामगारांना द्यावीत. तसेच मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडील घरे सुद्धा राज्य शासनाने मुंबई मनपाच्या सफाई कामगारांना घरे द्यावीत,’ अशी मागणी देखील आठवलेंनी केली आहे.

तसेच, कोरोना योद्धे म्हणून सफाई कामगारांना केंद्र सरकार ने दर्जा दिला आहे. सफाई कामगारांना धुळे मनपा ने मालकी हक्काची घरे दिली आहेत. मुंबई मनपा चे बजेट मोठे आहे त्यामुळे त्यातील 5 टक्के निधी सफाई कामगारांच्या घरासाठी तरतूद करावी. मुंबई मनपा च्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या मागणीसाठी मुंबई महापालिका आयुक्त आणि महापौर यांना आजच्या बैठीकीचा अहवाल देणारे पत्र पाठविणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या