नाशिकला जाणाऱ्या आयशर चालकाला गाडी लावून लुटणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : नाशिकला लोखंडी सळ्या पोहचविण्यासाठी निघालेल्या आयशर चालकाला पाच दिवसांपूर्वी लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. सद्दाम गुलाब शहा वय २४ रा. शरणापूर, सलमान उस्मान शहा वय २२ रा. शरणापूर अशी दोन्ही आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शरणापूर मार्गे नाशिकला लोखंडी सळ्या पोहचविण्यासाठी MH १९ Z ३०६५ हा आयशर निघाला होता. शरणापूर मार्गावरील एका हॉटेलच्या पाठीमागे तिघांनी रस्त्यात दुचाकी लावून. अयशरला थांबवले. त्यानंतर चालकाला काठ्यांनी बेदम मारहाण करत त्याच्या खिशातील १७ हजार रुपये काढून तिथून पोबारा केला.

आयशर चालकाला लुटणारे शरणापूर भागात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सपोनि अजबसिंग जारवाल यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकासोबत शरणापुरला धाव घेतली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर दोघांनी आयशर चालकाचे पैसे लुटल्याचे सांगितले. तपास कामा करिता त्या दोघांना दौलताबाद पोलिसांच्या हवाली केले. हि कारवाई सपोनि अजबसिंग जारवाल, विजय निकम, राजेंद्र साळुंके, तात्याराव शिनगारे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

IMP