शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी

औरंंगाबाद : डीएमआयसीकडे हस्तांतरीत झालेल्या जमिनीचा मोबदला मिळालेल्या शेतकऱ्याला फ्लॅट घेूवन देण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आदित्य रत्नाकर गारपगारे (वय २७, रा. सुतार पार गल्ली. ता.पैठण) आणि योगेश पंडीत उभेदळ (वय २८, रा. खेर्डा ता. पैठण) दोघांची हर्सूल गारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी रविवारी (दि.१२) दिले.

पैठण तालुक्यातील गणेश रावण ढोबळे (वय ३३, रा. जांभळी) यांच्या वडिलांच्या नावे असलेली काही जमीन डीएमआयसी अंतर्गत हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामोबदल्यात ढोबळे कुटुंबियांना २५ लाख रुपये मिळाले होते. या पैशातून स्वत:चे घर घेण्याची त्यांची इच्छा होती. तर मित्र सचिन जाधव, अशोक शेजुळ, योगेश उभेदळ यांना ढोबळे घराच्या शोधात असल्याचे माहिती होते.

त्यामुळे त्यांनी आदित्य रत्नाकर गारपगारे, त्याचा मामा मंगेश पारसनाथ भागवत, विपुल वक्कानी, संदीप भगत यांच्याशी ओळख करुन दिली. त्?यानंतर आरोपींनी थ्री बीएचके फ्लॅट घेवून देतो म्हणत ढोबळे यांना २५ लाखांचा गंडा घातला. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :