हार्दिक पंड्या आणि के एल राहुलच्या जागी मिळणार ‘या’ २ खेळाडूंना संधी

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी शुक्रवारी एका टीव्ही कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी त्या दोघांवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासकीय समिती समोर ठेवला होता.दरम्यान, प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबित केले आहे.

रंगेल हार्दिक पंड्या आणि के एल राहुलच्या जागी शुभम गिल आणि विजय शंकर यांना संघात जागा देण्यात आली आहे. पहिल्यांदा शुभमला वनडे टीममध्ये घेण्यात आलं आहे. १९ वर्षाच्या गिलने धमाकेदार प्रदर्शन केलं होतं. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १० इनिंगमध्ये ९८.७५ च्या रनरेटने ७९० रन केले. यामध्ये २ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. याआधी गिल न्यूजीलंड दौऱ्यात भारत ए टीमचा भाग होता. २०१८ मध्ये भारताच्या अंडर-१९ वर्ल्डकप विजेत्या टीमचा तो सदस्य होता.