दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील ‘या’ दोन नेत्यांना मिळाले स्थान

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली निवडणुकीची तारीख जवळ आल्यानंतर आता रंगत वाढत चालली आहे. विविध पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता लक्ष प्रचारसभांच्या नियोजनावर लागले आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर या दोन महाराष्ट्रातील नेत्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहे.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांची फौज भाजपचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या जावडेकर आणि गडकरी या दोन नेत्यांची नावे आहेत.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी 24 तासांत भाजपाला दुसरा धक्का बसला आहे. भाजपाचा महत्त्वाचा सहकारी शिरोमणी अकाली दलानंतर आज मंगळवारी हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जननायक जनता पार्टी यांनीही दिल्ली विधानसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जेजेपी सहभागी होणार नाही असे चौटाला यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात होणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. या मतदारसंघातून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे उमेदवार अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने रोमेश सभरवाल यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने या मतदारसंघातून भाजपच्या युवा मोर्चाचे दिल्ली अध्यक्ष सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे. यादव हे पेशाने वकील असून त्यांना उमेदवारी देऊन भाजपने अनेकांना धक्का दिल्याचं बोललं जातंय.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात