‘येऊ कशी तशी..’मालिकेत येणार ट्विस्ट; काही वर्षांनंतर ओम कसा दिसणार..!

‘येऊ कशी तशी..’मालिकेत येणार ट्विस्ट; काही वर्षांनंतर ओम कसा दिसणार..!

om

मुंबई : छोटया पडद्यावरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सुरू झाल्यापासूनच घरोघरी लोकप्रियता वाढत गेली. ओम आणि स्वीटू यांची प्रेम कहाणी देखील तितकीच आवडू लागली होती, मात्र मध्यंतरी यात रटाळपणा आल्याने यावर प्रेक्षकांनी नाराजी दाखविली आहे. रंजक वळण येणार असून आगामी काळात नेमकं काय पहायला मिळणार आहे, याकडे उत्सुकता वाढली आहे.

मालिकेत स्वीटू आणि ओमचे लग्न होणार होते, मात्र तिला मोहितशी लग्न करावे लागते. या प्रकारामुळे प्रेक्षक या मालिकेवर खूप भडकले ओमशी नाही, तर दुसराच मुलगा लग्न करतोय असे वेगवेगळे प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत होते. तसेच मालिकेचा लेखक काहीही लिहित आहे, असे म्हणत होते. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे की,’येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका आता काही वर्षाचा झेप (लिप) घेणार आहेत. मालिकेची टीआरपी खूप कमी येत आहे तसेच प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे मालिकेच्या लेखकांनी मालिकेने झेप घेत असून कोणतं वळण येणार याकडे लक्ष आहे.

दरम्यान या मालिकेत यानंतर ओमचा लूक कसा असणार आहे, याची देखील झलक दाखवली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या मालिकेत काय बदल घडून येणार आहेत, मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात लोकप्रियता निर्माण करेल का, स्वीटू आणि ओम एकत्र येतील का, याकडे प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या