fbpx

बालाकोटचे सत्य १० दिवसांत समोर येईल; काँग्रेस खासदाराचा खळबळजनक दावा

टीम महाराष्ट्र देशा – काँग्रेसच्या एका खासदाराने तर 10 दिवसांत बालाकोटचे सत्य समोर येईल असं खळबळजनक विधान केलं आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असं जोरदार युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे.हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईवरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मध्य प्रदेशातील सतनामध्ये एका सभेत बोलताना काँग्रेस खासदार अजय सिंह यांनी बालाकोटमधील हल्ल्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये बॉम्ब डागण्यात आले. पंतप्रधान म्हणतात की बालाकोटमध्ये सगळं नष्ट झालं आहे. न्यू-यॉर्क टाइम्स म्हणतं की हवाई हल्ल्यांमुळे काही नुकसान झालेले नाही. आज नाही तरी पुढल्या 10 दिवसांमध्ये सर्व घटनाक्रम उघड होईल, असं वक्तव्य अजय सिंह यांनी केले आहे.

तर, हवाई दलाने केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणे हा त्यांचा अपमान असल्याची टीका भाजप समर्थकांनी केली आहे.