जिवंत कार्यकर्त्याला भाजपने ठरवले ‘शहीद’; सत्य पुढे आल्याने पडले तोंडघशी

कर्नाटक: कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आला असून सर्वच पक्षांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. दुसऱ्यांपेक्षा आपण कसे भारी आणि जनतेचे सेवक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या कॉंग्रेस आणि भाजपकडून सुरु आहे. याच दरम्यान भाजपला एका चुकीमुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.

झाल अस कि, कॉंग्रेसच्या सत्ताकाळात जिहादी‘ हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या २३ कार्यकर्त्यांची यादी भाजपने प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये पहिल्या क्रमाकांवर अशोक पुजारी नावाच्या कार्यकर्त्याच नाव टाकण्यात आल. २० सप्टेंबर २०१५ रोजी त्याचा मृत्यू झाल्याच यादीमध्ये सांगण्यात आल. मात्र आता अशोक पुजारी हा जिवंत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे भाजपची फसवेगिरी समोर आल्याची टीका कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.

 उडुपीतील भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी ही यादी तयार करून केंद्रीय गृहखात्याकडे पाठविली होती. या यादीमध्ये अशोक पुजारीच्या नावाचा समावेश असल्याच समोर आल्यानंतरप्रसारमाध्यमांनी पुजारीच्या गावी जाऊन पडताळणी केल्यावर सर्व वास्तव समोर आले आहे.  

 

You might also like
Comments
Loading...