न्यासा संस्था आरोग्य विभागाने निवडली नव्हती; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

न्यासा संस्था आरोग्य विभागाने निवडली नव्हती; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

rajesh tope

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ऐनवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि यामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रचंड असंतोषाला आणि विरोधकांच्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान आता या परीक्षांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज दुपारी 2 ते 3 तास याबाबत बैठक झाली होती व त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

यावेळी टोपे यांनी परीक्षा एजन्सी असलेली ‘न्यासा संस्था’बाबतही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘न्यासा संस्था आरोग्य विभागाने निवडली नव्हती. परीक्षा एजन्सीची निवड माहिती आणि तंत्रज्ञान विभाग करतो. आरोग्य विभागाने पेपर सेट करून दिलाय. एवढीच जबाबदारी आरोग्य विभागाची असते. आरोग्य विभागाचं काम हे परीक्षेचा पेपर तयार करणे हे होतं. पेपर प्रिटिंग, परीक्षा केंद्र निवडणं, इतर बाबी या संबंधित एजन्सीच्या असतात. आरोग्य विभागानं पेपर तयार करुन त्यांच्याकडे सोपवण्याचं काम केलंलं आहे.’ असे स्पष्टीकरण यावेळी टोपे यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या