तिहेरी तलाक कायदा राज्यसभेत पास होवू नये म्हणून कॉंग्रेसमधील नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव

National Congress

पुणे: तिहेरी तलाक कायदा अजून शक्तिशाली व्हायला हवा. तिहेरी तलाक मध्ये तीन वर्षाची शिक्षा असायलाच हवी. लोकसभेत बिल पास झाले असताना राज्यसभेत कायदा पास होवून नये यासाठी विरोधक मुख्यत कॉंग्रेसमधील कपिल सिब्बल, गुलाब नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा हे सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबाव आणत असल्याचा आरोप माजी खासदार आरिफ मोहम्मद खान यांनी केला.

Loading...

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ४८ व्या वर्धापनदिन निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, नूरजहॉं साफिया नियाज, वकील बालाजी श्रीनिवासन, शमसुद्दीन तांबोळी आदी उपस्थित होते. यावेळी बालाजी श्रीनिवासन यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, नूरजहॉं यांना समाज प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पाकिस्तान सारख्या देशात तिहेरी तलाकला मान्यता नसताना आपल्या देशातच का असाही प्रश्न मोहम्मद खान यांनी उपस्थित केला. पाकिस्तान सारख्या देशात तिहेरी तलाकवर १९६० साली बंदी आणण्यात आली असताना भारतात का नाही. तिहेरी तलाक कडे नुसत तलाक म्हणून पाहता येणार नाही. हा विषय मानवधिकाराचा आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवणे हे समाजासाठी घातक आहे. असेही ते म्हणाले.

नूरजहॉं म्हणाल्या, समाजाती इतर धर्मातील महिलांना हक्क आहेत तेच हक्क आम्हला सुद्धा मिळायला हवे यासाठी २०११साली आम्ही कामाला सुरुवात केली. ५ हजार महिलांचा सर्वे घेण्यात आला. यात ९० टक्यापेक्षा जास्त महिलांनी तिहेरी तलाकला विरोध दर्शविला आहे. तिहेरी तलाक बरोबरच हलाल, बहूपत्नीत्व सुद्धा या कायद्यात यायला हव्या. लवकरात लवकर मुस्लिम कोड बिल यायला हवं. अशी मागणी त्यांनी केली.

मुस्लिम धर्मात सुधारणे बाबत बोलले की भाजपा कडे झुकल्याचा आरोप नेहमी होतो. हे चुकीचे आहे. संविधानात ज्या प्रमाणे सर्वांना हक्क देण्यात आले तेच हक्क आम्हाला हवे. शरियत मुस्लिम धर्मात, मुस्लिम देशात कुठे ट्रिपल तलाक नसताना सेक्युलर भारतातच का असा सवाल तांबोळी यांनी यावेळी केला.

जेष्ठ अभिनेते नसारूद्दीन शाह यांनी हमीद दलवाई यांचे विचार आजही लागू आहेत. अभिनेते बऱ्याचदा दुसऱ्याचे विचार लोकांपर्णत पोचवतात त्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी खूप कमी मिळते. मी हमीद दलवाई यांच्या मुस्लिम धर्म सुधारणेच्या विचारांशी सहमत असून त्याचे विचार आजही समाजासाठी लागू आहे, अशी भावना व्यक्त केली.Loading…


Loading…

Loading...