Share

Drishyam 2 | थ्रिलर सस्पेन्ससह ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई: बॉलीवूड अभिनेता अजय देवगन यांच्या ‘दृश्यम’ चित्रपटानंतर ‘दृश्यम 2’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत होते. थ्रील आणि सस्पेन्स आलेल्या दृश्यम चित्रपटाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. त्यानंतर चाहते दृश्यम 2 ची आतुरतेने वाट बघत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे . कारण अभिनेता अजय देवगन याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे दृश्यम 2 या चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. त्याचबरोबर दृश्यम 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला असून यामध्ये जबरदस्त थ्रील आणि सस्पेन्स बघायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

दृश्यम 2 ट्रेलर रिलीज

अजय देवगन चा बहुप्रतिक्षित चित्रपट दृश्यम 2 त्याचा ट्रेलर लॉन्च झाला असून चाहत्यांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे दृश्यम प्रमाणेच दृश्यम 2 मध्ये देखिल आपल्याला भरपूर सस्पेन्स बघायला मिळणार आहे. ट्रेलरच्या शेवटी विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगन हा कन्फेशन करताना दिसत आहे. त्याच्या या कन्फेशन मुळे चाहत्यांमध्ये आता तो नक्की काय कन्फेस करणार आहे याची खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे विजयाच्या 7 वर्षे जुन्या गुपितावरून वरून पडदा उठणार असल्याचे असे दिसत आहे.

दृश्यम 2 रिलीज डेट

अजय देवगनच्या दृश्यम 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला असून हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटातील इतर कलाकार

दृश्यम 2 या चित्रपटांमध्ये विजय साळगावकरच्या मुख्य भूमिकेत अजय देवगन दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये अक्षय खन्ना, इशिता दत्ता, तब्बू, मृणाल जाधव, श्रिया सरण आदी कलाकार दिसणार आहेत.

मुंबई: बॉलीवूड अभिनेता अजय देवगन यांच्या ‘दृश्यम’ चित्रपटानंतर ‘दृश्यम 2’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत होते. थ्रील आणि सस्पेन्स …

पुढे वाचा

Entertainment