टीम महाराष्ट्र देशा: 2020 साली देशातच नाही तर जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. कोरोना महामारीमुळे सर्वांनाच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत आपण कोरोनावर विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो आहोत. पण तो लॉकडाऊनचा काळ प्रत्येकासाठीच खूप कठीण काळ होता. अशात बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनी या लॉकडाऊनच्या वेदना चित्रित करत ‘इंडिया लॉकडाऊन’ (India Lockdown) हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी भारतातील कोरोना काळातील परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर (Trailer) रिलीज झालेला आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जात आहे.
इंडिया लॉकडाऊन या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोरोना काळामध्ये लोकांच्या जीवनात कसा बदल झाला याबद्दल दाखवण्यात आले आहे. लॉकडाऊन ची परिस्थिती समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी असून ती अत्यंत कठीण होती. 2020 मध्ये सुरुवातीचा 21 दिवसांचा लॉकडाऊन लोकांनी निभावून नेला. मात्र, त्यानंतर जवळपास तीन-चार महिन्यांच्या लॉकडाऊन लोकांचे जीवन विस्कळीत करून टाकले होते. त्यामुळे लोकांना त्यांची शहर, घर आणि जवळच्या प्रियजनांना भेटता आले नाही.
दिग्दर्शक मधुकर भांडारकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून लॉकडाऊन काळातील मुद्दे सहजपणे मांडण्याचा प्रयत्न केले आहे. Zee स्टुडिओच्या यूट्यूब चैनलवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रत्येक जण भावूक होत आहे. कारण देशातील प्रत्येक व्यक्तीने या परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे.
इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट ओटीपी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी OTT ॲप Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रतीक बब्बर, श्वेता प्रसाद बापू, साई ताम्हणकर, आहाना कुमार, प्रकाश बेलावेदी यासारखे कलाकार दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या काय आहेत निर्णय
- Hatchback Car | छोट्या जागेमध्ये देखील सहज बसू शकतात ‘या’ हॅचबॅक कार
- Rahul Gandhi | “भारत जोडो यात्रा रोखूनच दाखवा”, राहुल गांधींचं खुलं आव्हान
- Nitin Gadkari | पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात नितीन गडकरींची तब्येत बिघडली
- Shoeb Akhtar | ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे पाहिले पोस्टर रिलीज, ‘हा’ अभिनेता करणार शोएब अख्तरची भूमिका