हर्बर मार्गावर सीएसटीहून अंधेरीला जाणारी वाहतूक ठप्प

मुंबई : हर्बर मार्गावरील माहिम स्थानकाजवळ रेल्वेचे ६ डबे घसरल्यामुळे सीएसटीहून अंधेरीला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याची माहिती सूत्रांक़डून देण्यात आली आहे.

याप्रकरणी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांशी संपर्क साधला असता दोघेही एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्न करित आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या ऐन मुहूर्तावर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.