राज्यातील ट्रान्सपोर्टधारकांचा उद्या चक्काजाम, स्कूल बसही उद्या बंद

टीम महाराष्ट्र देशा- डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, टोल टॅक्स माफ करा, आरटीओ पासिंगचे टॅक्स कमी करण्यात यावे, वाहतूक तसेच इन्शुरन्सच्या समस्या आदी मागण्यांसाठी राज्यातील मोटार मालक, ट्रान्सपोर्टधारक यांच्या वतीने उद्या रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टच्या वतीने अनिश्चित काळासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस चालू ठेवाव्यात, असेही असोसिएशनने म्हटले आहे. तसेच, एकदिवसीय संपाचा निर्णय उशिरा कळवत असलो, तरी आमच्याकडे संपाशिवाय कुठलाच पर्याय नव्हता, असेही स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने म्हटले आहे.

राज्यातील आमदारांची ‘चांदी’ ; प्रवास भत्ता तिपटीने वाढला

हा अर्थसंकल्प होता की कवी संमेलन – राधाकृष्ण विखे पाटील