‘जीभेला हाड असतंच…’; अमेयचा मराठी टंग टीवस्टरचा भन्नाट व्हिडीओ

amey vagh

मुंबई:  मराठीचा युवा स्टार अभिनेता अमेय वाघने अनेक चित्रपटा आणि नाटकात काम केले आहे. त्याच्या अभिनय कौशल्याने स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे. अमेय वाघ सोशल मिडीयावर देखील बराच सक्रिय असतो. नुकतेच त्याने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केली आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

अमेयने इन्स्टाग्रामवर टंग टीवस्टरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ  शेअर करत त्याने म्हटले की, जीभेला हाड असतंच. ते थोडं वळवावं लागतं !, हे टंग टीवस्टर संजना पाटणकर ह्यांनी तयार केले आहेत. ज्यांना Acting मध्ये career करायचंय आहे त्यांनी तर ह्याचा सराव नक्की करा! या व्हिडिओत अमेय क, ख,ग या मुळअक्षरावरून काही टंग टीवस्टर म्हटले आहे.

अमेयचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तेजस्विनी पंडितने देखील कमेंट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या