घरपट्टी भरण्यासाठी काँग्रेसवर वर्गणीतून पैसा गोळा करण्याची वेळ

नाशिक: काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर वर्गणीतून पैसा गोळा करण्याची वेळ आली आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने नाशिक महानगरपालिकेची २६ लाख ६३ हजार रुपयांची घरपट्टी थकवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध कर विभागाने काँग्रेस कमिटीसह शहरातील ३९४ अस्थापनांना जप्तीची नोटीस बजावली आहे.

congress

महापालिका प्रशासनाने २१ दिवसात थकबाकी भरली नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेश पातळीवर याबाबत माहिती दिली होती. मात्र वरिष्ठ पदाधिकारीकडून कान टोचण्यात आल्याने २६ लाख ६३ हजार एवढी मोठी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवर वर्गणीतून पैसा गोळा करण्याची वेळ आली आहे.

You might also like
Comments
Loading...