शिवशाही बस सेवेचे तिकीट झाले कमी

रत्नागिरी – एसटी महामंडळाने शिवशाही स्लीपर सेवेचे तिकीट दर १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून कमी करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे. शिवशाही बसची मिसळणारी चुकीचा सेवा यामुळे याचा प्रतिसाद कमी होत आहे. म्हणूनच एसटी महामंडळाने तिकीट दर कमी केले आहेत.

त्याच पार्श्वभूमीमीवर रत्नागिरीतील सहा फेऱ्यांचे दर कमी केले आहेत. रत्नागिरी-मुंबई तिकीट ९५५ वरुन ७१५ रुपये इतके झाले आहे. रत्नागिरीतून सुटणाऱ्या मुंबई , पुण्याकडील गाड्यांचे तिकीट दर १८० ते २४० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत.

संगमेश्वर- मुंबई फेरीचा दर ८३० वरून ६३० रुपये झाला असून २१० रुपये सूट मिळणार आहे. चिपळूण- मुंबईचा दर ७१५ वरून ५३५ रुपये केला असून १८० रुपये सूट मिळेल. रत्नागिरी-निगडीचे ९१० वरून ६८० रुपये झाले आहे. पाली- निगडी मार्गाचा दर ८४५ वरून ६३० रुपये केला असून २१५ रुपये सूट मिळणार आहे. साखरपा- निगडी मार्गावरील ७६५ रुपये तिकीट ५७० रुपये झाले आहे.