fbpx

…म्हुणुन खासदार गायकवाड यांचे तिकीट कापले गेले

तुळजापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी अखेर शिवसेनेने युवा सेनेचे सरचिटणीस तथा कळंबचे माजी आ. ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी मातोश्री वरुन जाहीर झाल्याने सेनेचा उमेदवारीचा सस्पेंस अखेर संपुष्टात आला आहे. संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी आपले वजन वापरुन आपल्या गटातील ओमराजे यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिल्याने जिल्हयाचे शिवसेने नेतृत्व आ. तानाजी सावंत कडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रा. रविंद्र गायकवाड खासदार असताना मतदारांशी न ठेवलेला संपर्क ,पक्षवाढीसाठी न केलेले काम, नाँट रिचेबल म्हणून मतदारांन मध्ये तयार झालेली प्रतिमा व फक्त उमरगा लोहारा तालुक्यात असलेले वर्चस्व या अनेक कारणांमुळे त्यांची उमेदवारी पत्ता अखेरच्या कट झाल्याचे समजते.

उस्मानाबाद जिल्हयात रेल्वै ,पासपोर्ट कार्यालय आणण्या बाबतीत त्यांनी दाखवलेली निष्क्रीयता त्यांचा खासदार निधीतुन करण्यात आलेल्या विकास कामांची लागलेली वाट ठळक पणे मतदारांचा नजरेस आली.
याचा लाभ भाजपानेपुर्णपणे उचलला होता.

प्रारंभी खासदार रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी देण्याबाबतीत उध्दव ठाकरेंचा होकार होता त्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याचे आदेश सुटले होते माञ त्यानंतर शिवसेनेमध्येच त्यांच्या उमेदवारी विरोधात निर्माण झालेली नाराजी थेट मातोश्री पर्यत पोहचल्याने अखेर त्यांची उमेदवारी काढुन घेवून ती ओमराजे यांना जाहीर करण्यात आली.

ओमराजे यांना उमेदवारी मिळाल्याने उमरगा लोहारा वगळता इतर तालुक्यातुन या उमेदवारीचे शिवसैनिकांसह भाजपामधुन स्वागत केले जात आहे तर उमरगा लोहारा तालुक्यात शिवसेनेत सन्नाटा पसरला आहे.
शिवसेनेने ओमराजेना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीकाँग्रेस कडून आ. राणाजगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

गायकवाड यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

खा.रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने प्रा रविंद्र गायकवाड यांचा गट काय भूमिका घेणार या कडे सर्वांचा नजरा लागल्या असुन प्रा.रविंद्र गायकवाड यांची ताकीद उमरगा लोहारा मतदार संघापुरती मर्यादित असल्याने त्यांचा बंडाचा परिणाम तितकासा होण्याची शक्यता कमी आहे.