अभिनेत्री नुशरतच्या हॉरर चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित

nusrat

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री नुशरत भरूचा ही बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. नुशरतने नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ‘छोरी’ असे तिच्या आगामी हॉरर चित्रपटाचे नाव असून हा थरार प्रोमो पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

नेहमीच काही ना कारणामुळे चर्चेत असलेल्या नुशरतने नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोत ‘भीतीचा एक नवीन चेहरा आपल्याला त्रास द्यायला येत आहे, छोरी ऑन प्राईम,’ असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. या व्हिडिओत एक महिला लाल रंगाच्या लेहंगामध्ये बसलेली दिसत आहे. ही महिला गरोदर असून भूत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्या गडद अंधार, चमकत्या वीजा आणि गच्चीवर बसलेली भूत या प्रोमोत पाहायला मिळत आहे. त्यानंतर ‘छोरी’ असे चित्रपटाचे नाव दिसते.

या हॉरर चित्रपटाचा प्रोमो असल्याने तो पाहिल्यावर अक्षरश: अंगावर काटा येतो. या चित्रपटाच्या माध्यमातून नुशरत पहिल्यांदाच एखाद्या हॉरर चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. मात्र तो कधी प्रदर्शित होणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नुसरत भरुचासह या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. छोरी हा चित्रपट लपाछपी या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला जाणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या