सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ‘त्या’ तिघांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

prozone mall sex racket

औरंगाबाद- प्रोझोन मॉल मध्ये काही दिवसांपूर्वी सेक्स रॅकेट चा पर्दाफाश करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले होते त्यात मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती जे हा व्यवसाय मुंबईत बसून चालवत होते. या तिघांचाही अटक पूर्व जमीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी नामंजूर केला आहे .
सिडको परिसरात असणाऱ्या प्रोझोन मॉल मधील स्पा वर पोलिसांनी छापा टाकला होता त्यात त्यांनी 4 विदेशी आणि दोन देशी मुली, चार ग्राहक आणि तेथे काम करणारे तिघे अशा १८ जणांना अटक केली होती. यापैकी विदेशी मुलींची सावित्रीबाई सुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर उर्वरित नऊ जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या स्पा सेंटरचा मालक डेरेक इलिस मायडो, फैजन रईस शेख आणि विशाल कृष्णा शेट्टी यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जमीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस. महाजन यांच्यासमोर दाखल केला होता .यावर १५ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्या तिघांना अटक केल्याशिवाय या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती तपास अधिकारी शिवाजी कांबळे आणि मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून न्यायालयाने त्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. दरम्यान, स्पाचा व्यवस्थापक शशांक खन्नाने याची पोलिस कोठडी संपल्यामुळे १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची हर्सूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली.

सुधारगृहात ठेवल्यात त्या विदेशी तरुणी

थायलंडच्या तरुणींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर करण्यात आले. दुभाषी मिळाल्यावरच त्या तरुणींची चौकशी करण्यात येईल, असे तपास अधिकारी कांबळे यांनी सांगितल्यामुळे त्यांची सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.