अयोध्या निकालाच्या अंतिम निर्णयावर ‘या’ संघटनेने दाखल केली पुनर्विचार याचिका

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. जमियत-उलेमा-ए हिंद या मुस्लिम संघटनेने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत प्रामुख्याने बाबरी मशिदीच्या सुप्रीम कोर्टाने केलेल्या टिपण्णीवर बोट ठेवण्यात आले आहे.

तीन आठवड्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी निकाल दिला होता. यात प्रकरणी जमीयत-ए-उलेमा-ए-हिंदच्या वतीने असा युक्तिवाद केला गेला आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की मस्जिद मंदिराची मोडतोड करुन बांधली गेली होती, याचा पुरावा नाही. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले आहे की 1949 मध्ये तेथे मूर्ती ठेवल्या गेल्या. तसेच, डिसेंबरला झालेल्या (विध्वंस) जे घडले ते चुकीचे होते, म्हणून वादग्रस्त जमीन एखाद्या पक्षाला कशी दिली जाऊ शकते, हा निर्णयात विचार केला गेला आहे. जमीअतचे वकील एम सिद्दीकी यांनी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवावा आणि राम मंदिर बांधण्याच्या दिशेने घेतलेली पावले त्वरित थांबवावीत अशी मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्या नंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह काही संस्थानी या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर विचारविनिमय केला जात असल्याचे सांगितले होते. ६ डिसेंबर या दिवशी बाबरीचे पतन झाले होते. तो दिवस साधून येत्या ६ डिसेंबर रोजी याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, त्याआधीच जमियतने आज पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...