भारत सरकारचा ‘तो’ आरोप चुकीचा, टिक टॉकने निवेदन जारी करत केला खुलासा

नवी दिल्ली : भारत-चीन सीमारेषा भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यात टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अप्लिकेशनचा समावेश आहे. नुकतंच याबाबतचं पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

पुण्यात जोरदार पाऊस; तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान भारतात टिक-टॉक लाखो चाहते आहेत. या चाहत्यांना मात्र यामुळे झटका बसला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

मोठी बातमी : टिक टॉक, युसी ब्राऊझर सह 59 चिनी अॅप्स वर बंदी; भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक !

यावर आत टिक टॉकने खुलास करत निवेदन जारी केलं असून आम्ही चिनी सरकारला भारतीयांची माहिती दिलेली नाही असं म्हटलं आहे. भारत सरकारने एकंदर ५९ अ‍ॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी केला असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे टिकटॉक काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील वापरकर्त्यांची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता व अखंडता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी म्हटलं आहे.