‘देशात ऑगस्टच्या अखेरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार’ ; आयसीएमआर दिले संकेत

3rd wave

नवी दिल्ली : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच, या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे. अखेर आता तिसरी लाट केव्हा पर्यंत येणार, याबाबतची वाच्छता आयसीएमआरचे प्रो. डॉ समीरन पांडा यांनी केली आहे. तसेच त्यांनी या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणारे मुद्दे हे सांगितले आहेत.

देशात ऑगस्टच्या अखेरपर्यंत कोरोनाची लाट येईल. या तिसऱ्या लाटेत देशात दररोज 1 लाख कोरोना रुग्णांचे निदान होईल, अशी भितीही डॉक्टर पांडा यांनी व्यक्त केली. तसेच कमी झालेले लसीकरण आणि लॉकडाऊनच्या निर्बंधात करण्यात आलेल्या शिथिलताच या तिसऱ्या लाटेला कारणीभूत असल्याचं डॉ समीरन पांडा यांनी सांगितले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी नीती आयोगानंदेखील कोरोना स्थितीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. पुढील १०० दिवस देशासाठी महत्त्वाचे असतील, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तिसऱ्या लाटेचा धोका बोलून दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या