मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राजेश टोपे म्हणाले की,’ राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचे आहे. आज आपण बघतो आहोत की काल ४५ हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. तिसरी लाट कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटपर्यंत उच्चांक गाठेल असे वाटते. तसेच त्यानंतर तो खाली जाईल असे तज्ज्ञांचे मत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावेत आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावेत’, असेही टोपे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- “नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<