#खुशखबर_: उद्यापासून कोव्हिड लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीला सुरुवात

पुणे : गेले ६ महिने देशासह राज्यात कोरोनाने कहर घातला आहे.या रोगामुळे लाखो नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवरील लसींवर आता संशोधकांना मोठं यश प्राप्त होत आहे. याआधी कोरोना लस बाजारात येण्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या.

युकेमधील लसीमध्ये काही अडचण आल्याने देशात सिरम संस्थेने देखील या लसीवरील चाचणीस थांबवले होते. आता आरोग्य विभागाने हिरवा कंदील दिल्याने या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सुरुवात झाली आहे. यासाठी देशभरातून हजारो स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला असून यातील काही ठराविक स्वयंसेवकांना सर्व चाचण्या व नियमांच्या पूर्ततेनंतर या टप्प्यातील मानवी चाचणी करण्यात येईल.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :