चोरट्याने कुलरच्या मोटारी लांबविल्या; आठ दिवसात नेल्या १२० मोटारी

चोरट्याने कुलरच्या मोटारी लांबविल्या; आठ दिवसात नेल्या १२० मोटारी

औरंंगाबाद : सध्या शहरात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात चोरींचे प्रमाण वाढले आहे. यात दुचाकी आणि इलेक्ट्रॉनिक समान यांच्या चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. पोलीस वेळोवेळी नाकेबंदीसह विविध उपाय करत असले तरी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटजवळील जुना कृतुबपुरा येथे राहणाऱ्या शेख आसेफ शेख यासीन (वय २९) यांच्या घराच्या कंपाऊंडमधुन चोरट्याने ७२ हजार रूपये किंमतीच्या १२० मोटर चोरून नेल्या.

हि घटना २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात घडली असल्याचे शेख आसेफ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार दिवटे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या