औरंगाबाद: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हपमेंट कार्यालयासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आमखास मैदानालगत कार्यालय विकसित करण्यात आले आहे. ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना आता वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन ही जागा प्रशासक आस्तिकुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांनी स्मार्ट सिटीला २१ कोटीत विक्री केल्याचा आरोप केला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीने देखील आता या संदर्भात खुलासा केला असून ही जागा १९९४-९५ पासून महानगरपालिकेची असल्याचा दावा केला आहे.
स्मार्ट सिटीने केलेल्या खुलाशात म्हटले आहे, अण्णाभाऊ साठे विद्यार्थी वस्तीगृह ही इमारत बांधकाम करण्यासाठी १९९४-९५ च्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली होती. १९९८-९९ या आर्थिक वर्षात इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असून यास ६० लाखांचा खर्च करण्यात आला होता. महानगरपालिका विद्यार्थी वस्तीगृह चालविण्यास सक्षम नसल्यामुळे सर्व साधारण ठराव घेऊन समाज कल्याण विभागास ते भाडेतत्वावर देण्यात आले होते. या इमारतीचा ताबा घेतल्या पासून समाज कल्याण विभागाने इमारतीचे भाडे न भरल्याने २०१५ मध्ये पंचनामा करुन इमारत महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आली.
ही इमारत महानगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर ही इमारत विना वापर राहिल्याने या इमारती मधील सर्व दरवाजे, खिडक्या, ग्रिल, जिन्याची फरशी, लोखंडी गेट, विद्यृत वायरींग परिसरातील नागरीकांकडून चोरी गेल्याचे लक्षात आले. किलेअर्क या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त वस्तीगृह नव्याने बांधण्यात आलेले असून या ठिकाणी विद्यार्थांच्या निवासाची सोय झालेली आहे. या पार्श्वभूमीवर इमारतीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी डिसेंबर २०२० मध्ये स्मार्ट सिटी कार्यालयाची मुख्य इमारत व ऑपरेशन कंमांड सेंटरसाठी देण्यात आली. भविष्यात ही मालमत्ता महापालिकेचीच राहणार असल्याचा खुलासा स्मार्ट सिटीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
- भाजपचा अजून एक दावा ठरला फोल? काँग्रेसने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले,’पंजाब माफ नाही करणार’
- “मुख्यमंत्री ठाकरे योग्य निर्णय घेतली आणि कोरोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<