बीड : राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट व शिंदे गट स्थापन झाले आहेत. खरी शिवसेना कोणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहेत. मात्र ग्राम पातळीवरील निवणडणुकीत दोन्ही गट आमने – सामने आले आहेत. बीड जिल्ह्याच शिदें गटाने झेंडा फळकवला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात शिंदे गटाने वर्चस्व निर्माण केलं आहे. बीड तालुक्यातील तीन ग्रामपंचायती पैकी दोन ग्रामपंचायती वर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भगवा फडकला आहे. तर एक ग्रामपंचायत उध्दव ठाकरे यांच्या सेनेने कायम राखली आहे. राज्यातील राजकारणामध्ये शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आले असताना बीड जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये देखील शिंदे गटाने वर्चस्व सिद्ध केलं आहे.
गवळवाडी ग्रामपंचायत वर उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा विजय-
बीड तालुक्यातील अंथरवनपिंपरी आणि पिंपरीतांडा या ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. यामध्ये शिंदे गटाने बाजी मारत दोन्ही ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. तर बीड तालुक्यातील गवळवाडी ग्रामपंचायत वर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने विजय मिळवला आहे. यात दोन्ही गटाकडून ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात विजयाचे दावे केले.
शिवसेना कुणाची आहे? –
दरम्यान, शिवसेना कुणाची आहे? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? सर्वोच्च न्यायालयात काल (गुरुवार) झालेल्या सुनावणीतही निर्णय होऊ शकला नाही. आता सर्वोच्च न्यायालय सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. गुरुवारच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला (EC) विनंती केली की सर्वोच्च न्यायालयाची भूमिका स्पष्ट होईपर्यंत शिवसेनेवर कोणाची सत्ता आहे यावर कोणताही निर्णय घेऊ नये. हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचे की नाही यावर सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. जर हे प्रकरण घटनापीठाकडे गेले तर खटला बराच काळ चालेल, पण तसे न झाल्यास लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sunil Raut । संजय राऊतांच्या भोंग्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रिपद मिळालं – सुनील राऊत
- Sharad Pawar | संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार गप्प का? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- Ajit pawar | “नुकसानग्रस्त भागात तातडीने मदत द्या”; अजित पवारांची सातत्याने मागणी
- Ajit Pawar । मंत्रिमंडळ विस्तार करायला सरकार कशाला घाबरत आहे?; अजित पवार आक्रमक
- Sudhir Mungantiwar | काही लोक राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या मालकीचा समजतात – सुधीर मुनगंटीवार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<