कोरोना काळात ठाकरे सरकार घरात लपले होते; भाजपा खा. हीना गावित

कोरोना काळात ठाकरे सरकार घरात लपले होते; भाजपा खा. हीना गावित

हीना गावित

मुंबई : जनादेशाचा अनादर करुन सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने (Thackeray Government) कोरोनाकाळात भ्रष्टाचार, ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटले. केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला, अन्यथा घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती, अशी टीका भाजपा खासदार डॉ. हीना गावित (MP Heena Gavit) यांनी राज्य सरकारवर केली आहे.

गुरुवारी हीना गावित आणि भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये हे पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना गावित म्हणाल्या, कोरोनाकाळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. भ्रष्ट कारभारामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली व हजारो सर्वसामान्यांना नाहक प्राण गमवावे लागले.

केंद्र सरकारकडून वेळोवेळी कानपिचक्या मिळूनही भ्रष्टाचार सुरूच राहिल्याने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली व सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्याने मात्र संधीची चांदी करून घेतली. प्रत्येक अपयशावर पांघरुण घालत केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकारला या काळात गरीबांसाठी मिळालेली मदतही लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात अपयश आल्यामुळे असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, असा आरोपही खासदार गावित यांनी केला.

महत्वाच्या बातम्या