हिंदी चित्रपटातील नीच खलनायक प्रमाणे ठाकरे सरकार वागत आहे, निलेश राणे यांची टीका

nilesh rane

मुंबई : राज्य सरकारकडून दरड दुर्घटनाग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत काही निकष ठरवून पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व विचार करून दरडग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करू, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

त्यावर, भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार आणि विजय वडेट्टीवारांवर जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडियाद्वारे ही टीका केली आहे. ते म्हणले, ‘लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला. विचार करेपर्यंत लोकं मेली तरी चालतील, यावरून कळतं या हलकट सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे. इतका नीच तर हिंदी पिक्चर मधला कुठला विल्हन देखील नसेल जितकं नीच ठाकरे सरकार लोकांशी वागत आहे.’

दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन पुरामुळे विस्कळीत झाला आहे. तेढे अनेक नेते दौरे करत आहे. केंद्राने पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारयण राणे यांना पाठवले होते. तसेच केंद्राने ७०१ कोटी रुपयांची मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या