‘ठाकरे सरकारने पोलिसांचे पोतेरे करून टाकले; दिल्ली पोलीस इथे येऊन कारवाई करतात आणि…’

dilip walse patil and bhatkhalkar

मुंबई : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरूनच भाजपने यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य करत हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘पोलीस खात्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. पोलिसांना त्यांना सोयीप्रमाणे, प्रोफेशनल पद्धतीनुसार काम करण्यास परवानगी आहे. पोलीस राज्यात प्रोफेशनल पद्धतीनेच काम करतायत हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं,’ असं गृहमंत्री म्हणाले.

यासोबतच, ‘पोलिसांना चौकशीबाबत संपूर्ण स्वातंत्र्य असून ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करु द्यायला हवं. उगाच कुणी राजकारण करण्याची गरज नाही,’ असं प्रत्युत्तर देखील त्यांनी विरोधकांना दिलं आहे.

आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना कोणते टार्गेट पूर्ण करण्यासाठी गुंतवून ठेवलं होतं, हे सगळ्या जगाला ठाऊक झाले आहे. ठाकरे सरकारने पोलिसांचे पोतेरे करून टाकले. दिल्ली पोलीस इथे येऊन कारवाई करतात, मग आपले दहशतवाद विरोधी पथक काय करते आहे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील महोदय?’ असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या