गुजरात विधानसभेत कमी झालेल्या जागांचा भाजपला राज्यसभेत फटका

एप्रिल महिन्यात गुजरातमधून राज्यसभेसाठी चार जागांसाठी निवडणूक होत आहे

टीम महारष्ट्र देशा: गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सलग सहाव्यांदा विजय प्राप्त करण्यास भाजपला यश प्राप्त झाले असले तरी जागांमध्ये मात्र घट झाली आहे. भाजपला 99 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसला 80 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या कमी झालेल्या जागेंचा भाजपला राज्यसभेत चांगलाच फटका बसणार आहे.

एप्रिल महिन्यात गुजरातमधून राज्यसभेसाठी चार जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपच्या विधानसभेच्या जागा घटल्याने भाजपचे राज्यसभेत चारपैकी दोनच उमेदवार जातील. त्यामुळे गुजरात विधानसभेमध्ये मिळालेल्या कमी जागेचा तोटा मात्र भाजपला राज्यसभेमध्ये होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जागेसह अन्य तीन राज्यसभेच्या जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे.

You might also like
Comments
Loading...