WTC चा अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमला मिळणार ‘एवढी’ रक्कम

virat vs wilamsan

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल.  आयसीसीने पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामना जिंकणाऱ्या टीमसाठीची रक्कम घोषित करण्यात आली आहे.

हा सामना  जिंकणाऱ्या टीमला तब्बल 11.72 कोटी रुपये मिळणार आहे, तर उपविजेत्या टीमला 5.85 कोटी रुपये मिळतील. विजेत्या टीमला मिळणारी ही रक्कम विराट कोहलीला आयपीएलमध्ये मिळणाऱ्या मानधनापेक्षाही कमी आहे. विराटला आयपीएल मधून 17 कोटी रुपये मिळतात.

केन विलियमसन आणि विराट कोहलीला अजूनपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे हे दोन्ही कर्णधार या सामन्यात जिंकायचा प्रयत्न करतील. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार जर मॅच टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल, त्यामुळे दोन्ही टीमना समसमान रक्कम दिली जाईल, त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडला जवळपास प्रत्येकी 8.78 कोटी रुपये मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या