‘द कपिल शर्मा शो’च्या टीमने घेतली कोरोना लस

मुंबई : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचा शो म्हणून प्रसिद्ध असलेला ‘द कपिल शर्मा’ पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या शोचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात शोमधील सर्वा कलाकार काळ्या रंगाचे कपडे परिधान करत एन्ट्री करताना दिसत आहे.

टिव्ही जगतात कपिल शर्मा हा विनोदी अभिनेता म्हणून घराघरात पोहोचला आहे. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. कोरोनामुळे बंद पडलेला हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यापुर्वी या कार्यक्रमातील कलाकारांनी कोरोना लस घेतली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर कपील शर्माने सहकलाकारासोबत एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने ‘तुम्ही लस घेतली का?’ असा प्रश्न करत अप्रत्यक्षपणे लस घ्या असे चाहत्यांना आवाहन केले आहे.

कपिल शर्माने ट्विट केलेल्या या फोटोत कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, भारती सिंह, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर हे सर्व कलाकार आहेत. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच सुरु झाले आहे. काही दिवसापुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या शोचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात ओसरताच पुन्हा चित्रकरणाला सुरुवात झाली असुन काही दिवसातच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP