महिलांच्या टी-20 विश्वचषकासाठी झाली संघाची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपदाची धुरा हमनप्रीत कौरकडे आहे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधानाकडे सोपवण्यात आली आहे. महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे. या विश्वचषक स्पर्धेत यजमान आणि गतविजेत्या असलेल्या ऑस्ट्रेलियासह, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि थायलंड हे संघ सहभागी होणार आहेत.

Loading...

या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना सिडनीत २१ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर दुसरा सामना २४ फेब्रुवारी रोजी बांगालदेशविरुद्ध पर्थ येथे होणार आहे. तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध मेलबर्न येथे २७ रोजी खेळवला जाईल. साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध २९ फेब्रुवारी रोजी मेलबर्नमध्ये होईल. साखळी फेरीनंतर ए आणि बी ग्रुपमधील टॉप संघ सेमीफायनलमध्ये खेळतील. दोन्ही सेमीफायनल ५ मार्चला मेलबर्न मैदानावर तर फायनल लढत ८ मार्चला पण तिथेच खेळवला जाईल.

असा आहे भारतीय महिला संघ :  हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जॅमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रीचा घोष, तानिया भाटीया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्तरकर आणि अरुंधती रेड्डी.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले