हिवाळी अधिवेशन काळातील आंदोलनावर शिक्षक संघटना ठाम

अहमदनगर: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाची विविध शैक्षणिक मागण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात १३, १४ व १५ डिसेंबर रोजी महाधरणे आंदोलनास संघटना ठाम असून या आंदोलनात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.

शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आ.नागो गाणार व राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषदेचे शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली.आठ दिवसात सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री तावडे यांनी दिले.तसेच महाधरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेची राज्य कार्यकारणी बैठक पुणे येथे झाली.

Loading...

१ व २ जुलै २०१६ रोजी घोषित शाळा व तुकड्यांना व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गांना अनुदान मिळणे, जुनी पेंन्शन योजना लागू करणे,२३ ऑक्टोबर २०१७ चा शासन निर्णयामधील अट क्र.४ रद्द करणे,चुकीचे संच निर्धारण व समायोजन,अतिरिक्त शिक्षकांचे वेतन, १६२८ शाळांना पुढील टप्पा अनुदान मिळणे,यासोबतच अदिवासी विकास व समाज कल्याण आश्रम शाळांतील शिक्षकांच्या प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

महा राज्यव्यापी धरणे आंदोलनात सहभागी होवून हक्काच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी जिल्हयातील शिक्षकांसह विनाअनुदानित शाळातील शिक्षकांनी आंदोलना बाबत जागृत राहून आंदोलन यशस्वी करण्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सरकार्यवाह नरेंद्र वातकर,विभागीय कार्यवाह रमेश चांदुरकर,राज्य कार्यवाह सदस्य राजेंद्र गुजरे, विभागीय अध्यक्ष जे.के.शर्मा,विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरकर,कार्यालय मंत्री गंगाधर टप्पे,नाशिक विभाग अध्यक्ष प्रा.सुनिल पंडीत प्रयत्नशील आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले