महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: अखेर ‘तो’ नराधम शिक्षक निलंबित

पुणे : पुण्यातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीला पास करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची चीड आणणारी घटना सर्वप्रथम ‘महाराष्ट्र देशा’ने उघडकीस आणली होती. विद्येच माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षकांच्या नावाला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या बातमीनंतर वडगाव बुद्रुक येथील श्री शिव छत्रपती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने त्या नराधम शिक्षकाला निलंबित केले आहे. यासबंधी माहिती संस्थेचे विकास दांगट यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली आहे.

Loading...

संदीप कांबळे ( रा, वडगाव पठार. पुणे) असे शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव बुद्रुक भागामध्ये असणाऱ्या श्री शिव छत्रपती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात हा सर्व प्रकार घडला आहे.

संबंधित विद्यार्थिनी या महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए. वर्गामध्ये शिकत आहे. संदीप कांबळे हा विद्यार्थिनीला फोन करून ‘तुला पास व्हायचं असेल तर आपण एका लॉजवर जाऊ, मग मी तुला पास करतो’ म्हणून फोन करत होता. शिक्षकाच्या अशा मागणीने घाबरलेल्या विद्यार्थिनीने याची माहिती आई-वडिलांना दिली. कुटुंबीयांनी पालकसंघटनेचे शिवा पासलकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर आता हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाईकर करत आहेत.Loading…


Loading…

Loading...