पुणे: पास करण्यासाठी शिक्षकाने विदयार्थीनीला केली शरीरसुखाची मागणी; पोलिसांत गुन्हा दाखल

mit crime

पुणे: विद्येच माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षकांच्या नावाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीला पास करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची चीड आणणारी घटना घडली आहे.

संदीप कांबळे ( रा, वडगाव पठार. पुणे) असे शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव बुद्रुक भागामध्ये असणाऱ्या श्री शिव छत्रपती कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात हा सर्व प्रकार घडला आहे.

Loading...

संबंधित विद्यार्थिनी या महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए. वर्गामध्ये शिकत आहे. संदीप कांबळे हा विद्यार्थिनीला फोन करून ‘तुला पास व्हायचं  असेल तर आपण एका लॉजवर जाऊ, मग मी तुला पास करतो’ म्हणून फोन करत होता. शिक्षकाच्या अशा मागणीने घाबरलेल्या विद्यार्थिनीने याची माहिती आई-वडिलांना दिली. कुटुंबीयांनी पालकसंघटनेचे शिवा पासलकर यांच्याशी संपर्क साधत त्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर आता हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाईकर करत आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले