लक्ष होतं ७ कोटींचं मात्र, अनुष्का-विराटने केली रेकॉर्डतोड कमाई ; काही दिवसातच जमा केले एवढे पैसे

VIRAT ANUSHKA

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा
स्थगित करण्यात आली आहे.

आयपीएलची स्पर्धा स्थगित झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या घरी परतला आहे. महत्वाचे म्हणजे, घरी परतल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराट कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत करत आहे.

कोविड १९ रिलीफ मदतीसाठी अनुष्का आणि विराट यांनी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू केली होती. त्यावर प्रत्येकाने जमेल तेवढ्या पैशाचे योगदान करावे असे आवाहन देखील केले होते. कोणतीही रक्कम जीव वाचवण्यासाठी कमी नाही. परंतु या संघर्षासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. या मोहिमेत सर्वांना सहभागी होण्याची विनंती अनुष्का आणि विराट यांनी केली होती.

त्यांच्या या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले होते. आणि काही दिवसातच या दोघांनी कोरोनाच्या लढाईसाठी 11 कोटी रुपये जमा केले आहेत. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने या अभियानासाठी दोन कोटी रुपये दिले आहेत. यातून जमा झालेली रक्कम एसीटी ग्रांट्सला दान करण्यात येणार आहे. एसीटी ग्रांट्स ऑक्सिजन आणि उपचारांशी जोडल्या गेलेल्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम करते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP