भीडू एक प्रश्न विचारायचा आहे; ‘बिग बी’सोबत जग्गू दादा ‘हॉटसीटवर’

भीडू एक प्रश्न विचारायचा आहे; ‘बिग बी’सोबत जग्गू दादा ‘हॉटसीटवर’

amitab

मुंबई : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ या शोमध्ये टॅलेंट,नॉलेजसह अनेक जण आपलं नशिब आजमावण्यासाठी या मंचावर येत असतात. माहितीसह मनोरंजनाच्या  खजान्यात जॅकी श्रॉफ यांच्या खास ‘टपोरी’ भाषेतील संभाषण लवकरच चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.

नुकतच या शोचे प्रोमो प्रेक्षकांना पहायला मिळत असून या प्रोमोमध्ये जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी हॉट सीटवर बसल्याचे दिसत आहे. दरम्यान बिग बी जॅकी श्रॉफ यांना ‘भीडू एक प्रश्न विचारायचा आहे… ही जी भीडू भाषा आहे ती तू कशी शिकलास?’ असा प्रश्न विचारला. त्यावर जॅकी श्रॉफ यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच आश्चर्य वाटले. जॅकी श्रॉफ उर्फ जग्गूदादा म्हणाले, ‘सर, सर्वात पहिले आपण राहात असलेला भाग आणि दुसरे म्हणजे तुम्ही.’ते ऐकून बिग बी आश्चर्यचकित झाले. त्यानंतर बिग बींनी त्यांचा अमर अकबर अँथेनी चित्रपटातील डायलॉग रिक्रिएट केला आणि म्हणाले, ‘ऐसा तो आदमी जीवन में दो समय भागता है, ऑलिंपिक का रेस हो, या पुलिस का केस हो. तुम किस लिए भाग रहा है भाई?’

अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत असून हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारताना त्यांच्या जीवनातील किस्से सांगतात. या शोच्या आगामी भागामध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी हजेरी लावणार आहेत. दरम्यान जॅकी श्रॉफने ‘भीडू’ ही टपोरी भाषा बोलण्यामागील कारण सांगितले आहे. सोशल मीडियावर सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केबीसीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या