आर्थिक मदतीसाठी तालिबानने अमेरिका वगळता सर्वांचे मानले आभार

amir-biden

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमधील आर्थिक परिस्थिती सध्या फारच ढासळली आहे. त्यामुळे आता जगभरातून त्यांच्या मदतीसाठी कोट्यवधींची मदत केली जात आहे. अफगाणिस्तानवर कब्जा करून स्वतःची सरकार स्थापन करणाऱ्या तालिबानने या आर्थिक मदतीसाठी जगभरातील अमेरिका वगळता सर्वच देशांचे आभार मानले आहे. तसेच यावेळी त्यांनी अमेरिकेवर टीकास्त्र देखील सोडले आहे. ते म्हणाले की,’अमेरिकेने गरीब देशांबद्दल जरा मन मोठे मन करावे’.

तालिबानच्या सध्याच्या सरकारमधील परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी हे एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत असतांना म्हणाले की,’आम्ही हे पैसे विचारपूर्वक खर्च करणार आहोत असं मुत्तकी म्हणाले. ‘या पैशांचा वापर दारिद्र्य दूर करण्यासाठी केल जाईल. आम्ही जगभरातील देशांनी केलेल्या एक अब्ज डॉलर्सच्या मदतीसाठी त्यांचे आभार मानतो. भविष्यातही ते अशाप्रकारची मदत करतील अशी अपेक्षा आहे. पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून हा पैसा गरजूंपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सरकार करेल,’असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी अमेरिकेवर टीकांचा वर्षाव करत ते म्हणाले की,’मागील महिन्यामध्ये आम्ही अमेरिकन लष्कराबरोबरच हजारो लोकांना परतण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेरिकेने तालिबानचे कौतुक केले पाहिजे. अमेरिका एक मोठा देश असून चे मन मोठे करावे’,असेही मुत्तकी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या