मंद्रूप चे तहसील कार्यालय राज्यात आदर्शवत करावे- आ. सुभाष देशमुख

सोलापूर प्रतिनिधी – जागेची अडचण असतानाही चांगल्या पद्धतीने मंद्रूप येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे या तहसील कार्यालयातील शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहेत. अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून हे कार्यालय राज्यात आदर्शवत करावे, असे आवाहन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे नूतन अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. सोलापूरचे खा. जयसिध्देश्वर महास्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान स्थानी होते.

यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार अमोल कुंभार, सभापती सोनली कडते, मंद्रूपचे नायब तहसीलदार उज्ज्वला सोरटे, अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड, मंद्रूपच्या सरपंच कलावती खंदारे, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, काँग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके, पंचयती समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, पं.स. सदस्य महादेव कमळे, शशिकांत दुपारगुडे, शालीनी चव्हाण, हणमंत कुलकर्णी, रावजी कापसे, हणमंत पुजारी, संगप्पा केरके, भिमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, गौरीशंकर मेंडगुदले, दीपाली व्हनमाने माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, विभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मंद्रूपचे पोलीस उपनिरीक्षक संदीप धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की, या अप्पर तहसील कार्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आता सोलापुरात जावे लागणार नाही. मन्द्रुप येथेच त्यांची कामे पूर्ण होतील. जिल्ह्याचे व तालुक्याचे कार्यालय बदल करण्यासाठी खूपच अडचण येतात. तरीही माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे आज हे शक्य झाले आहे.

खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, आ. सुभाष देशमुखांच्या तालुक्यातील प्रत्येक कामाकडे राज्याचे लक्ष आहे. त्यांनी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मंद्रुप येथे एमआयडीसीसाठी प्रयत्न केले. तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाकडे देशमुख यांचे लक्ष असून ते सोडवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठ पाठपुरावा करत असतात. सुभाष देशमुख यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व तालुक्याला लाभले हे भाग्याचे आहे. यावेळी खासदार महास्वामी यांनी शेतकऱ्यांनी एकमेकास सहाय्य करून आपापली कामे करावीत असे आवाहनही केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोलापूर जिल्ह्याचे प्रांत अधिकारी ज्योती पाटील यांनी करत आ. देशमुख यांच्या कल्पनेतून मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय पूर्ण झाल्याचे सांगितले.

प्रत्येक गावात जलशुद्धीकरण केंद्र करणार: देशमुख

दक्षिणच्या अनेक गावामधील अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका खराब असून त्यांना नवीन शिधापत्रिका देण्याचा प्रयत्न करावा, शेतकऱ्यांचे शेतातील रस्त्यासाठी वाद मोठ्या प्रमाणात असून ते सोडण्यासाठी प्रयत्न करावे, येथील एम.आय.डी.सी. च्या जागेचे भूसंपादन पूर्ण करावे, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज व पाणी मिळाल्यास शेतकरी समाधानी राहतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करत तालुक्यातील प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रत्येक गावात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे सांगितले. तहसिलदार उज्वला सरोटे यांनी तालुक्यातील शाळाही डिजिटल व सुसज्ज करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून तालुक्यातील खाजगी शाळेकडे वाढलेला ओढा हा जिल्हा परिषद शाळेकडे येईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.