fbpx

युती सरकारला ‘लाज कशी वाटत नाही’ या टॅगलाईनने महाघाडीचा प्रचार

congress and ncp

टीम महाराष्ट्र देशा – सरकारने गेली पाच वर्ष फक्त फसवणूकच केली.पाच वर्षापूर्वी सत्तेत येताना महागाई कमी करण्याच आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात ती कमी होण्याऐवजी वाढत आहे. शेतकरी कर्जमाफी, उज्ज्वला योजना, युवकांना नोकऱ्या यासारख्या फसव्या योजना व घोषणांमुळे मोदी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे.

या सर्व मुद्यांवरून ‘लाज कशी वाटत नाही’, या टॅगलाईनचा वापर करत काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी विविध जाहिरातींच्या माध्यमातून राज्यात संयुक्तपणे प्रचार करणार आहे.

बेटी बचाव, बेटी पढाव अशी घोषणा एकीकडे केली जाते आणि दुसरीकडे भाजप आमदार मुली पळवून आणण्याची भाषा करतात. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत देशातील जनतेच्या मनात असलेले प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

लाज कशी वाटत नाही’? या प्रचार अभियानाच्या माध्यमातून उपस्थित करत सरकार विरोधातील वातावरण निवडणुकीच्या काळात तापविण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.