स्वारगेट स्थानकावर शुकशुकाट, रेल्वे सेवा सुरळीत

पुणे : भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणानंतर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शहरासह जिल्हाभरात तणावपूर्ण शांतता असून रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र बंदचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. नेहमी प्रवाश्यांच्या गर्दीने गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकावर आज सकाळी शुकशुकाट पसरलेला होता.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून बारामती, सातारा बस वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...