जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे

मुंबई : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल होत. त्यामुळे त्यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्याचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष होते. प्रशांत परिचारक याचं निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला आहे.

चौकशी समितीने आज अहवाल सादर केला. प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रशांत परिचारक यांची सभा होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत, विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.
“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.

You might also like
Comments
Loading...