औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!

औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत मराठवाड्यातील रेल्वे विकासासंदर्भात विविध मागणी व मुद्दे उपस्थित करुन औरंगाबाद-अहमदनगर दरम्यान ११५ किमी नवीन रेल्वेमार्ग करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत.

खासदार इम्तियाज जलील यांनी १५ व १६ मार्च रोजी लोकसभेत मराठवाडा व औरंगाबादेतील रेल्वे विकास करण्याबाबत विविध मुद्दे उपस्थित करुन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद-अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग बनविण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, औरंगाबादला आधुनिक रेल्वे स्थानकासाठी मान्यता देण्यात यावी, औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग बांधण्यात यावा, औरंगाबादला पुण्याशी जोडण्यात यावे.

तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासात्मक कामासाठी वाढीव निधी देण्यात यावा, असे विविध मुद्दे उपस्थित करुन त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली होती. जलील यांनी मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे विभागाचे विकास होवून रेल्वेस्थानकांवर यात्रेकरुंना अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या यासाठी उपस्थित केलेल्या प्रस्ताव व विकास कामांबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुद्देनिहाय प्रस्ताव, मागण्या व कामांबाबत केंद्र शासनाच्या रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल पत्राद्वारे खा. इम्तियाज जलील यांना कळविले आहे.

यात औरंगाबाद – चाळीसगाव नवीन प्रकल्पाची किंमत १६८९.५१ कोटी रुपये इतकी असुन नकारात्मक परतावा (-) २.२३ टक्क्यांसह असल्याने या प्रस्तावावर पुढे कोणत्याही प्रकारची कार्यवाही होवु शकली नाही. औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद – अहमदनगर दरम्यान नवीन रेल्वेमार्गासाठी (१५५ किमी) सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. अहमदनगर दौंड मार्गे यापूर्वीच पुण्याला जोडलेले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागासाठी रेल्वे मंत्रालयाची मागणी क्रमांक ८४ च्या भांडवलाच्या अंतर्गत ३८७.५५ कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या