सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ एक उत्तम ‘अपूर्ण न्याय’ आहे : असदुद्दिन ओवेसी

टीम महाराष्ट्र देशा : अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयावर अनेक मुस्लीम संघटनांनी नाराजी व्यक्त केली. तर एमआयएम चे नेते असदुद्दिन ओवेसी यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायलयाने दिलेला हा निकाल पूर्ण न्याय’ नाही, अशी प्रतिक्रिया पुन्हा ओवेसी यांनी दिली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे.

परंतु ”सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादात दिलेला निकाल, हा ‘पूर्ण न्याय’ नाही. त्यात कलम १४२ नुसार असेलेले अधिकार न्यायालयाने वापरायला हवे होते. हा एक उत्तम ‘अपूर्ण न्याय’ आहे व सर्वात वाईट ‘पूर्ण अन्याय’ आहे.” असे ओवेसी यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे. तसेच नुकतेच ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानेही सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर पुर्नविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या :