कृषी कायद्यांचा वाद सोडविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ‘या’ झुंजार नेत्यावर सोपवली जबाबदारी

कृषी कायद्यांचा वाद सोडविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ‘या’ झुंजार नेत्यावर सोपवली जबाबदारी

blank

नवी दिल्ली:- केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.

दरम्यान, या तीनही कायद्यांमुळे निर्माण झालेले वाद सोडवण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय कोर्टानं घेतला आहे. पुढचे आदेश येईपर्यंत ही स्थिगिती असेल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठीच्या समितीत बी.एस.मान, प्रमोद कुमार जोशी, अशोक गुलाटी आणि अनिल घनवट यांचा समावेश करण्यात आला आहे. अनिल घनवट हे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते आहेत तर अशोक गुलाटी कृषी शास्त्रज्ञ आहेत. तर प्रमोद जोशी आंतरराष्ट्रीय खाद्यान्न धोरण संशोधन संस्थेसाठी काम करतात.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठीच्या समितीत शेतकरी नेते अनिल घनवट यांचा समावेश केला आहे. अनिल घनवट हे सध्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात वास्तव्यास आहे. घनवट हे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नेते आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक आंदोलनात घनवट यांचा सहभाग असतो. एक उत्तम वक्ता म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात २५ सप्टेंबरला पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये असे आवाहन अनिल घनवट यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या