अॅट्रॉसिटीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दुर्देवी- प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar and suprim court

मुंबई: अॅट्रॉसिटीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दुर्देवी असून या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आंबेडकर यांनी अॅट्रॉसिटीबद्दलच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सडकून टीका केली. या आधी कॉंग्रेस आणि भाजपच्या दलित खासदारांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच अॅट्रॉसिटीबद्दल लवकरच सुप्रीम कोर्टात पुनरावलोकन याचिका दाखल करु, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, न्यायसंस्था एकमेकांवर विश्वास ठेवत नाही, असं चित्र दिसत आहे. कोर्टाचा अवमान कोर्टाने केला असून अॅट्रॉसिटी करणाऱ्याला अभय देण्याचं काम केल्याचंही त्यांनी म्हंटलं. कोर्टाने असे निर्णय दिले तर कोर्टावर असणारा विश्वास कमी होईल, कोर्टाच्या निर्णयाचा लोकांकडून विरोध केला जातोय, ते टाळायचं असेल तर न्यायसंस्थेने अशा गोष्टी करू नये ज्यामुळे कायद्याला वेसण घालतील.

भाजपच्या दलित खासदारांची भूमिका

अॅट्रॉसिटी निर्णयाबाबत सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी. अशी मागणी खासदारांनी केली. अशापद्धतीनेचे निर्णय व्हायला लागले, तर भविष्यात आमचं आरक्षण हिरावण्याचंच बाकी राहिल, अशी प्रतिक्रिया एका खासदाराने दिली. तर मनुवादी भविष्यात न्यायपालिकेच्या माध्यमातून दलितांवर अत्याचार सुरु राहतील. भाजपच्या एससी सेलचे प्रमुख विनोद सोनकर शास्त्री यांच्यासह यूपी, बिहारमधील दलित खासदारांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांची भेट घेऊन सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

कॉंग्रेसची भूमिका

अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात सरकारनं जाणीवपूर्वक दिरंगाई केली. सरकार दलित आणि आदिवासी विरोधी आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. कोर्टानं या निर्णयाचा पुनर्विचार कारावा, किंवा सरकरानं त्या दृष्टीनं कायद्यात बदल करावा, अशी मागणी केली. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला बोलत होते.