कोरोना नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कोरोना नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की अनेक राज्यांमध्ये कोविड मृत्यूचा सामना करणार्‍या कुटुंबांना देण्यात येणार्‍या ग्राशिया आर्थिक सहाय्यासाठी बोगस दावे मिळत आहेत. ज्यावर कोर्ट म्हणते की, अनेक लोक कोरोनाच्या मृत्यूसाठी एक्स-ग्रेशिया भरपाई मिळविण्यासाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे बनवत आहेत. तसेच आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला या खोट्या दाव्यांबाबत मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानंतर 21 मार्च रोजी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने असेही सुचवले आहे की कथित बनावट मृत्यूच्या दाव्यांची चौकशी कॅगकडे सोपवली जाऊ शकते. तुषार मेहता यांनी आज केंद्रातर्फे हजर राहून नुकसान भरपाईचे दावे दाखल करण्यासाठी बाह्य मर्यादा घालण्यात यावी असे सुचवले. लोकांना मृत्यूच्या 4 आठवड्यांच्या आत दावा दाखल करणे आवश्यक आहे. भरपाईचा दावा करण्याची प्रक्रिया अंतहीन नसावी. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम.आर.शाह यांनी याविषयी दु:ख व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी न्यायमूर्ती शहा म्हणाले की, आमची नैतिकता इतकी घसरली आहे की यात खोटे दावेही केले जात आहेत? असे बोगस दावे केले जातील असे आम्हाला कधीच वाटले नव्हते, नुकसान भरपाई देणे हे पवित्र कार्य आहे आणि या योजनेचा गैरवापर होईल असे कधीच वाटले नाही.

महत्वाच्या बातम्या